News & Announcement

आधार फाउंडेशन पुणे आणि मदत वेलफेअर ट्रस्ट पुणे ह्यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य खुली मराठी काव्यस्पर्धा २०२०

Mumbai, 13th Feb 2020
आधार फाउंडेशन पुणे आणि मदत वेलफेअर ट्रस्ट पुणे ह्यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य खुली मराठी काव्यस्पर्धा २०२०

नमस्कार मित्रहो !

उद्या 14 फेब्रुवारी म्हणजे तरुणाईचा दिवस. तरुणाई म्हटले तरी याला खरंतर वयाचे बंधन नव्हे तर स्नेहाचे अनोखे कोंदण आहे.  सेंट व्हँलेंटाईन दिवस !!
आणि आपल्या मनातील भावना , जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी शब्दांसारखं दुसरं प्रभावी माध्यम नाही.
म्हणूनच थेट तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आम्ही निवडला हा खास दिवस.
तुमच्यातील काही जणांना आपल्या भावना समोर पोहचवण्यासाठी कधी कवीवर्य कुसुमाग्रज ,पाडगावकर तर कधी सौमित्र ,चंगो पर्यंत एखाद्या कवितेचंं बोट धरावं लागत... पण असेही अनेक जण आहेत जे आपल्या मनातलं तितक्याच ताकदीने कागदावरही मांडतात.

 

अशा सर्वच कवी आणि कवयित्रींसाठी आम्ही या व्हॕलेंटाईन डे च्या शुभमुहूर्तावर यावर्षीही खुली मराठी कविता स्पर्धा घेऊन आलो आहोत. तर मग चला , मौका भी है और दस्तुर भी. यावर्षीही एक कविता होऊनच जाऊ दे.
स्पर्धेचे नियम तर तुम्हाला माहितीच आहेत तरी पुन्हा एकदा माहितीसाठी खाली दिले आहेत. आम्ही वाट बघतोय तुमच्या कवितेची!

नियम-

आम्हाला जाहीर करताना आनंद होतो की  'आधार फाउंडेशन पुणे' आणि 'मदत वेलफेअर ट्रस्ट पुणे' ह्यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य 'खुली मराठी काव्यस्पर्धा' आयोजित केली जात आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून स्पर्धेसाठी कुठलाही विषय अथवा आकृतीबंधाचे बंधन नाही.
कवितेसाठी पारितोषिक -  -

 

प्रथम क्रमांक - रू. १०,००० रोख आणि सन्मानचिन्ह.
द्वितीय क्रमांक - रू. ५,००० आणि सन्मानचिन्ह.
तृतीय क्रमांक - रू. ३,००० आणि सन्मानचिन्ह.
उत्तेजनार्थ एकूण चार पारितोषिके - प्रत्येकी रू. ५००.

 

स्पर्धेचे नियम :-
१. एका कवी/ कवयित्रीने एकच स्वरचित कविता पाठवावी.
२. कविता अप्रकाशित असावी. कवितेसाठी विषयाचे अथवा आकृतीबंधाचे बंधन नाही. वृत्तबद्ध कविता, मुक्तछंद, गझल इत्यादी कवितेच्या कुठल्याही प्रकारात कविता स्पर्धेसाठी पाठवू शकता.
३. कविता marathikavyaspardha@gmail.com ह्या मेल आयडीवर किंवा Whatsapp वर 7385018125 ह्या क्रमांकावर पाठवावी. इतर कुणालाही मेल करून किंवा मेसेज करून किंवा प्रिंट अथवा हस्तलिखित देऊ नये, अशी कविता गृहीत धरली जाणार नाही.
४. कविता पाठवताना विषय (subject) म्हणून 'आधार - मदत आयोजित काव्यस्पर्धा सहभाग' हा असावा.
५. ईमेल वर पाठवताना कविता 'टेक्स्ट' रुपात आणि देवनागरी लिपीत टंकलेखन करून वा 'युनिकोड' फॉण्टमध्ये पाठवावी. फोटो, पीडीएफ इ. स्वरूपातील सहभाग ग्राह्य धरला जाणार नाही.
६. अनुवादित कविता चालणार नाही.
७. कवितेसह कवी/ कवयित्रीने स्वत:चे पूर्ण नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक देणे आवश्यक आहे.
८. स्पर्धेसाठी कविता पाठवण्याचा कालावधी हा दिनांक १२ फेब्रुवारी २०२० ते २ मार्च २०२० असा असेल. त्यानंतर पोहोचलेल्या कविता स्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
९. स्पर्धेचा निकाल 'मदत फाउंडेशन'च्या फेसबुक पेजवर तसेच उमेश कोठीकर आणि दिपाली वारूळे ह्यांच्या फेसबुक वॉलवर जाहीर केला जाईल. तसेच विविध साहित्यिक समूहांवर जाहीर केला जाईल.
१०. या कवितास्पर्धेसाठी नामांकित कवी परीक्षक म्हणून काम पाहतील. निकालाबाबत परीक्षक व आयोजकांचा निर्णय अंतिम राहील. कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यास कुणीही बांधील नसेल.
११. ह्या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ₹१०० आहे.आपल्या कवितेसोबतच प्रवेश शुल्क जमा केल्याची पावती अथवा स्क्रीनशॉट पाठवावा. अन्यथा अशी कविता गृहीत धरली जाणार नाही.
१२. स्पर्धेच्या नियमांत व आयोजनात काही बदल झाल्यास ते कळविण्याचा प्रयत्न केला जाईल. असा कुठलाही बदल करण्याचा हक्क आयोजकांना राहील.
१३. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा दिमाखदार कार्यक्रमात आयोजित केला जाईल. मान्यवर कवी आणि साहित्यिक पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान केली जातील.
पारितोषिक वितरण सोहळ्याची तारीख जाहीर केली जाईल.
१४. या स्पर्धेविषयी काही माहिती विचारायची असल्यास उमेश कोठीकर दीपाली वारूळे ह्यांचेशी फेसबुकवर संपर्क साधावा.

 

प्रवेश शुल्क भरण्यासाठी खाते क्र.
मदत फाउंडेशन, पुणे
बँक ऑफ महाराष्ट्र
चुतुशृंगी शाखा,पुणे.
खाते क्र. -60319525238
IFSC Code -MAHB0000049
UPI transfer (Googlepay PhonePay, Paytm etc) साठी खालील नंबर वापरावा. 
8999156228

 

आपल्या सहभागाच्या प्रतिक्षेत,
शिल्पा देशपांडे
साहित्य विभाग प्रमुख
मदत वेल्फेअर ट्रस्ट
उमेश कोठीकर
दीपाली वारूळे
आधार फाउंडेशन आणि
मदत वेलफेअर ट्रस्ट पुणे.
धन्यवाद.

 

 #खुलीमराठीकवितास्पर्धा२०२०